मी सांगू इच्छितो की, माझ्या हातात असते तर मी हा प्रश्न केव्हाच सोडवला असता, परंतु हे एकाच्या हातचे नाही
मला असे वाटते की, सत्याग्रहांसारख्या गोष्टीमुळे हा प्रश्न सुटत नाही. माझा विश्वास आहे की, देशाच्या नेत्यांवर विश्वास ठेवल्यानेच उशिरा का होईना हा प्रश्न सुटेल. त्यामुळे भाषा कोणती बोलावी, कोणती बोलू नये हा ज्याच्या-त्याच्या स्वभावाचा प्रश्न होऊ शकतो. मला असे वाटते की, 'राजीनामे देऊ आणि राज्यकारभार विस्कळीत करू', अशा प्रकारची भाषा वापरून सुटणार नाहीत. हा प्रश्न तत्त्वाला धरून सुटला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे.......